तैसा तुका तळ्मळे

कन्या सासुर्यासी जाये, मागे परतुनी पाहे |
तैसे जाले माझ्या जीवा , केंव्हा भेटसी केशवा |
चुकलिया माये बाळ हुरुहुरु पाहे, जिवनावेगळी मासोळी तैसा तुका तळ्मळे |
-संत तुकाराम महाराज

अवघा तो शकुन

अवघा तो शकुन , हृदयी देवाचे चिंतन |
येथे नसता वियोग , लाभा उणे काय मग |
छंद हरिच्या नामाचा , शुचिर्भूत सदा वाचा |
तुका म्हणे हरिच्या दासा , शुभकाळ अवघ्या दिशा ||
-संत तुकाराम महाराज