ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या

भ्रमेणाहं भ्रमेण त्वं । भ्रमेणोपासका जनाः । भ्रमेणेश्वर भावत्वं । भ्रममूलमिदं जगत् ॥

वाच्यार्थ:
भ्रमामुळेच मी आहे, भ्रमामुळेच तु आहेस...भ्रमामुळेच उपासक भासत आहेत....भ्रमातुनच ईश्वर जाणवतो आहे...खरोखरीच हे जगच भ्रममूल आहे...

लक्ष्यार्थ:
"मी आहे" हाच एक आपल्याला झालेला अस्तित्वात्मक भ्रम आहे...त्यातूनच "तू आहेस" अर्थात मी आणि तू वेगळे आहोत असा भ्रम उत्पन्न झालेला आहे....खरेतर मी काय आणि तू काय ईश्वराचेच अंश आहोत...त्याचेच व्यक्त स्वरूप आहोत...
पण मी आहे च्या भ्रमातूनच उपासक, अर्थात साधक, आस्तिक आणि नास्तिक असे भ्रमात्मक भेद आपल्याला ज्ञात झालेले आहेत...मी साधक या भ्रमातूनच परमेश्वर वेगळा, अर्थात जाणीवस्वरूप भासतो आहे....

हे सर्व स्वाभाविकच आहे कारण हे जगच मुळी भ्रममूल आहे...

इथे अस्तित्वच नसलेल्या मूळमायेला मी कोण असा प्रश्न पडला तेंव्हा ती जगदाकारे व्यक्त होऊन पाहू गेली...."अहम् ब्रह्मास्मि" मीच ब्रह्म आहे असा भ्रम तिला/त्याला झाला....आणि त्यातूनच रोज नवे काहीतरी उत्पन्न करून हे मी नाही असे स्वत:चे समाधान तो सृष्टीकर्ता करून घेतो आहे आणि त्यावरच ही नश्वर सृष्टी सुरु आहे...या विश्वाची निर्मितीच मुळी अस्तित्वरूप भ्रमातून झालेली आहे....

निराकार, निर्विकार, निर्विकल्प, अतर्क्य,केवल अवस्था हेच खरे सत्य आहे....परंतु या त्याचे वैशिष्थ्य असे की येथे केवल सत्य आहे...मिथ्या असे काहीच नाही.... जर असेलच तर ती या जगताची जाणीव...
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या।

॥जय जय रघुवीर समर्थ॥

जपानचा भूकंप आणि २०१२


जपानचा भूकंप आणि २०१२


जपानमध्ये नुकत्याच झालेल्या विनाशकारी भुकंपाने समस्त मानव जमात भयकंपीत झालेली आहे....
या भुकंपाने आलेली त्सुनामी ही तात्पुरती फ़ारच क्षीण वाटावी असे संकट होते, हे म्हणण्याचे कारण असे की याभूकंपाने अजून काही भयानक गोष्टी आपल्या ताटात वाढून ठेवल्या आहेत...
त्यातीलच एक म्हणजे पृथ्वीचा कललेला आस!! या भुकंपाच्या दणक्याने जपानची भूमी फ़ूट सरकली आहे तरपृथ्वीचा आस - इंचाने कलला आहे...परिणामस्वरूप दिनमानात फ़रक पडला आहे! पृथ्वीचा परिवलनाचा वेगकिंचितसा वाढून दिवसाचा कालावधी १।८ मायक्रो सेकंदांनी कमी झाला आहे!
ऐकायला ही बाब किरकोळ वाटेल पण इथून पुढे येऊ घातलेल्या अनेम नैसर्गीक संकटांना ही बाब पोषक ठरणारचआहेच, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे! कल्पना करा! १।८ मायक्रोसेकंद कालावधी साठी अक्ख्या पृथ्वीचा जेवढापृष्ठभाग आहे त्यावर सूर्यप्रकाश कमी पडणार आहे! त्याने येत्या काळात पृथ्वीच्या वातावरणात अनेक बदलहोणार आहेत हे निश्चित!
एक विचार सहज मनात चाटून गेला...की सध्या ग्लोबल वॊर्मींग मुळे पृथ्वीचे तापमान वाढते आहे त्यावर तोडगाम्हणून तर पृथ्वीने ही गेम केली नसेल ना? माहीत नाही...कारण संतुलन राखणॆ हा निसर्गाचा नियम आहे आणित्याच्या अम्मलबजावणीसाठी त्याचेजवळ उपाय पण आहेत...

मला आश्चर्य वाटते ते या भूकंपाच्या टाइमींग चे! गेली अनेक वर्षे अनेक वेगवेगळे (एकमेकांशी काडीचही संबंधनसलेले) लोक असे भाकीत वर्तवत होते की २०१२ पासून भयानक कालखंड सुरु होणार आहे....यावर इतक्या चर्चारंगल्या की अखेर एक होलीवूड पट देखील येऊन गेला या विषयावर...२०१२ याच नावाचा...

भारतातील अनेक अध्यात्मिक गुरु देखील खाजगीत आपल्या शिष्यांना सावध करत आहेत...अनेक वर्षे ज्याचीवाट त्यांनी पाहिली तो काळ आता अगदी जवळ येऊन ठेपला आहे...इतका जवळ की तो आपल्याला याची देहीयाची डोळा अनुभवता येणार आहे!

यावर उपाय काय????


मला काही उपाय सुचतात ते असे...

) सर्व प्रथम असे काही तरी नजीकच्या भविष्यात घडणार आहे याची पक्की मानसीक तयारी ठेवा...
कारण बरेचदा लोक अशा घटनांच्या मानसीक धक्क्यानेच खलास होतात...

) निसर्गाचा कॊल ऐका...त्याच्या समन्वयात, हार्मनी मध्ये रहा...AUGUST RUSH या प्रसिद्ध चित्रपटातील एकवाक्य या निमित्ताने मला आठवते... "MUSIC IS ALL AROUND US...ALL YOU HAVE TO DO IS LISTEN"

) शक्य तितके साधे रहा...निसर्गाची मारून त्यावर गुजराण करणारे निसर्गाच्या हिटलिस्ट वर असतात हे कायमलक्षात ठेवा...

) अधिकाधिक काळ आत्म चिंतनात व्यतीत करा...त्याने विचार क्षीण होतात, फ़्रिक्वेन्सी लो अर्थात कमी कमीहोत जाते आणि तुम्ही निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाता...नामस्मरण हा त्यावरील एक सोपा उपाय आहे....

) सर्वात महत्वाचे काही संदेश:
तुका म्हणे उगेची रहावे जे जे होईल ते ते पहावे

अक्रा अक्रा बहु अक्रा काय अक्रा कळेचिना। गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभूवनी॥

पुढे अंत येईल तो दैन्यवाणा म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा

"ताठ बसा चळवळ" व्हिडीओ!!

"ताठ बसा चळवळ" व्हिडीओ स्वरुपात??? होय!! हे खरे आहे!

आमचे एक हितचिंतक श्री. धनंजय निद्रे यांनी हा सुंदर व्हिडिओ बनविला आहे...

जरूर पहा व प्रसार करा! आणि हो!!

ताठ बसा!!

प्रशांत