अकरा स्तोत्रे

समर्थ संप्रदायातील भक्तांची अशी श्रद्धा आहे की समर्थ रामदास हनुमंताचे अवतार होते. समर्थांची हनुमानभक्ती मात्र त्यांच्या वाङ्मयात पानोपानी प्रकट झाली आहे. लहानपणी सर्वच मुलांना हनुमंताचे आकर्षण असते. समर्थ लहानपणी आपल्या दंडाला हनुमंताचा ताईत बांधत असत. त्यांचा तो दंडातला मारुती आजही जांबेत पाहायला मिळतो. लहान मुलांना पराक्रमामुळे हनुमंत प्रिय असला तरी संत वाङ्मयात हनुमंताला स्थान आहे, ते त्याच्या दास्यभक्तीमुळे. भक्तश्रेष्ठ तुकाराम महाराजांसारखे संत हनुमंताला 'भक्तीच्या वाटा मला दाखव' अशी विनंती करतात. तेव्हा हनुमान हे भक्तीचे प्रतीक आहे. समर्थांनी हनुमंताचा उपयोग भक्ती आणि शक्ती यांच्या समन्वयासाठी केला.

समर्थांनी हनुमंताची हजारो मंदिरे उभी केली. त्यांची हनुमान मंदिरे दोन प्रकारची होती. जो हनुमान रामासमोर उभा आहे, तो हात जोडून दासाप्रमाणे उभा आहे. हा दासमारुती भक्तीचे प्रतीक आहे. जिथे एकट्या हनुमंताचे मंदिर आहे, तिथे हनुमंताच्या पायाखाली राक्षस दाखवला असून हनुमंत त्याला बदडून काढीत आहे असे दिसते. हा वीरमारुती शक्तीचे प्रतीक आहे. आपल्या हनुमंताच्या आरतीत 'रामी रामदासा शक्तीचा बोध' असे समर्थांनी स्पष्टपणे म्हटले आहे. याचा अर्थ, दुबळा समाज बलशाली करण्यासाठी समर्थांनी हनुमंताचा वापर केला. समर्थांनी निर्माण केलेली हनुमंतांची मंदिरे म्हणजे त्या काळातील व्यायामशाळा होत्या. एका व्याख्यानात स्वामी विवेकानंद म्हणाले- 'करा बघू जागोजागी हनुमंताची स्थापना! सगळे राष्ट्र कसे निवीर्र्य झाले आहे.' हनुमंत केवळ शक्ती आणि भक्तीचा समन्वय नाही. तर तो शक्ती, भक्ती आणि युक्ती यांचा त्रिवेणी संगम आहे.

संमर्थांना हनुमंताचा फार आधार वाटत होता. कारण त्यांचे वडील सूर्याजीपंत, बंधू गंगाधरपंत आणि स्वत: समर्थ या तिघांना हनुमंताचे दर्शन झाले होते. लहानपणी समर्थांना रामांनी अनुग्रह दिला आणि येथून पुढे हनुमान तुम्हाला सांभाळेल असे सांगितले. म्हणून समर्थांना हनुमंताचा खूप आधार वाटत होता. हनुमंताचे समर्थांवर खूप उपकार होते. या उपकारांचे उतराई होण्यासाठी समर्थांनी हनुमंताची एकवीस स्तोत्रे लिहिली आहेत. या स्तोत्रांवरून असे स्पष्ट दिसते की समर्थांच्या मते हुनमान हा समाजाचा संरक्षणमंत्री आहे. एक राष्ट्रीय दैवत म्हणून समर्थ हनुमंताची प्रतिमा उभी करतात.

समर्थ लिहितात :

' स्वधामासी जाता महारामराजा। हनुमंत तो ठेविला याचि काजा।

सदासर्वदा रामदासासी पावे। खळे गांजिता ध्यान सांडोनी धावे।

याचा अर्थ रामाच्या ध्यानात मग्न असलेला हनुमान भक्तावर संकट आले म्हणजे ध्यान बाजूला ठेवतो आणि धावत जातो. समर्थांना तत्कालीन विपरीत परिस्थितीत हनुमंतानेच सांभाळले आहे. म्हणून ते म्हणतात...

तुजविण मज पाहे पाहतां कोण आहे।

म्हणउनि मन माझे रे तुझी वास पाहे।

मज तुज नीरवीले पाहिजे आठवीले।

सकळिक निजदासांलागी सांभाळविले।।

समर्थांची हनुमंताला ही विनवणी आहे की तुझ्या शक्तीचा एक अंश तू आम्हाला दे. हनुमंताकडे शक्तीचा प्रचंड साठा आहे. तेव्हा त्याने त्यातला थोडा वाटा आम्हाला द्यायला हरकत नाही, असाही शेरा ते मारतात. एवढेच नव्हे तर तू कंजुषपणा करू नकोस, जरा मनाचा मोठेपणा दाखव असे सांगतात. ही स्तोत्ररचना केली त्यावेळी समर्थांना कफाची व्यथा होती. या स्तोत्रपठणाने त्यांची कफाची व्यथा दूर झाली. म्हणून काही कफपीडित समर्थभक्त कफावरील उपाय म्हणून या स्तोत्राचा उपयोग करतात.

समर्थांनी हनुमंताची कितीही स्तोत्रं लिहिली असली तरी 'भीमरूपी महारुदा वज्रहनुमान मारुती' हे त्यांचे स्तोत्र सर्वात लोकप्रिय ठरले. त्यांनी स्थापन केलेले अनेक मारुती या स्तोत्रातील वर्णनानुसार आहेत. 'पुच्छ ते मुडिर्ले माथा, किरीटी कुंडले बरी। सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकीणी नागरा।' असे मारुतीचे ध्यान आढळते. एका स्तोत्रात समर्थांनी बहे बोरगाव येथील हनुमंताची पौराणिक कथा दिली आहे. समर्थांनी हजारो मारुतीमंदिरे स्थापिली असली तरी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील त्यांचे अकरा मारुती प्रसिद्ध आहेत. या एकवीस स्तोत्रांपैकी अकरा स्तोत्रे अकरा मारुतींची आहेत. कोणत्या हनुमंताचे वर्णन कोणत्या स्तोत्रात आहे हे सांगणे मात्र कठीण आहे. हनुमंताचे चरित्र सांगणे, त्याच्या पराक्रमाचे वर्णन करणे हा या स्तोत्रांपाठीमागचा प्रमुख हेतू दिसतो.

- सुनील चिंचोलकर

ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या

भ्रमेणाहं भ्रमेण त्वं । भ्रमेणोपासका जनाः । भ्रमेणेश्वर भावत्वं । भ्रममूलमिदं जगत् ॥

वाच्यार्थ:
भ्रमामुळेच मी आहे, भ्रमामुळेच तु आहेस...भ्रमामुळेच उपासक भासत आहेत....भ्रमातुनच ईश्वर जाणवतो आहे...खरोखरीच हे जगच भ्रममूल आहे...

लक्ष्यार्थ:
"मी आहे" हाच एक आपल्याला झालेला अस्तित्वात्मक भ्रम आहे...त्यातूनच "तू आहेस" अर्थात मी आणि तू वेगळे आहोत असा भ्रम उत्पन्न झालेला आहे....खरेतर मी काय आणि तू काय ईश्वराचेच अंश आहोत...त्याचेच व्यक्त स्वरूप आहोत...
पण मी आहे च्या भ्रमातूनच उपासक, अर्थात साधक, आस्तिक आणि नास्तिक असे भ्रमात्मक भेद आपल्याला ज्ञात झालेले आहेत...मी साधक या भ्रमातूनच परमेश्वर वेगळा, अर्थात जाणीवस्वरूप भासतो आहे....

हे सर्व स्वाभाविकच आहे कारण हे जगच मुळी भ्रममूल आहे...

इथे अस्तित्वच नसलेल्या मूळमायेला मी कोण असा प्रश्न पडला तेंव्हा ती जगदाकारे व्यक्त होऊन पाहू गेली...."अहम् ब्रह्मास्मि" मीच ब्रह्म आहे असा भ्रम तिला/त्याला झाला....आणि त्यातूनच रोज नवे काहीतरी उत्पन्न करून हे मी नाही असे स्वत:चे समाधान तो सृष्टीकर्ता करून घेतो आहे आणि त्यावरच ही नश्वर सृष्टी सुरु आहे...या विश्वाची निर्मितीच मुळी अस्तित्वरूप भ्रमातून झालेली आहे....

निराकार, निर्विकार, निर्विकल्प, अतर्क्य,केवल अवस्था हेच खरे सत्य आहे....परंतु या त्याचे वैशिष्थ्य असे की येथे केवल सत्य आहे...मिथ्या असे काहीच नाही.... जर असेलच तर ती या जगताची जाणीव...
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या।

॥जय जय रघुवीर समर्थ॥

जपानचा भूकंप आणि २०१२


जपानचा भूकंप आणि २०१२


जपानमध्ये नुकत्याच झालेल्या विनाशकारी भुकंपाने समस्त मानव जमात भयकंपीत झालेली आहे....
या भुकंपाने आलेली त्सुनामी ही तात्पुरती फ़ारच क्षीण वाटावी असे संकट होते, हे म्हणण्याचे कारण असे की याभूकंपाने अजून काही भयानक गोष्टी आपल्या ताटात वाढून ठेवल्या आहेत...
त्यातीलच एक म्हणजे पृथ्वीचा कललेला आस!! या भुकंपाच्या दणक्याने जपानची भूमी फ़ूट सरकली आहे तरपृथ्वीचा आस - इंचाने कलला आहे...परिणामस्वरूप दिनमानात फ़रक पडला आहे! पृथ्वीचा परिवलनाचा वेगकिंचितसा वाढून दिवसाचा कालावधी १।८ मायक्रो सेकंदांनी कमी झाला आहे!
ऐकायला ही बाब किरकोळ वाटेल पण इथून पुढे येऊ घातलेल्या अनेम नैसर्गीक संकटांना ही बाब पोषक ठरणारचआहेच, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे! कल्पना करा! १।८ मायक्रोसेकंद कालावधी साठी अक्ख्या पृथ्वीचा जेवढापृष्ठभाग आहे त्यावर सूर्यप्रकाश कमी पडणार आहे! त्याने येत्या काळात पृथ्वीच्या वातावरणात अनेक बदलहोणार आहेत हे निश्चित!
एक विचार सहज मनात चाटून गेला...की सध्या ग्लोबल वॊर्मींग मुळे पृथ्वीचे तापमान वाढते आहे त्यावर तोडगाम्हणून तर पृथ्वीने ही गेम केली नसेल ना? माहीत नाही...कारण संतुलन राखणॆ हा निसर्गाचा नियम आहे आणित्याच्या अम्मलबजावणीसाठी त्याचेजवळ उपाय पण आहेत...

मला आश्चर्य वाटते ते या भूकंपाच्या टाइमींग चे! गेली अनेक वर्षे अनेक वेगवेगळे (एकमेकांशी काडीचही संबंधनसलेले) लोक असे भाकीत वर्तवत होते की २०१२ पासून भयानक कालखंड सुरु होणार आहे....यावर इतक्या चर्चारंगल्या की अखेर एक होलीवूड पट देखील येऊन गेला या विषयावर...२०१२ याच नावाचा...

भारतातील अनेक अध्यात्मिक गुरु देखील खाजगीत आपल्या शिष्यांना सावध करत आहेत...अनेक वर्षे ज्याचीवाट त्यांनी पाहिली तो काळ आता अगदी जवळ येऊन ठेपला आहे...इतका जवळ की तो आपल्याला याची देहीयाची डोळा अनुभवता येणार आहे!

यावर उपाय काय????


मला काही उपाय सुचतात ते असे...

) सर्व प्रथम असे काही तरी नजीकच्या भविष्यात घडणार आहे याची पक्की मानसीक तयारी ठेवा...
कारण बरेचदा लोक अशा घटनांच्या मानसीक धक्क्यानेच खलास होतात...

) निसर्गाचा कॊल ऐका...त्याच्या समन्वयात, हार्मनी मध्ये रहा...AUGUST RUSH या प्रसिद्ध चित्रपटातील एकवाक्य या निमित्ताने मला आठवते... "MUSIC IS ALL AROUND US...ALL YOU HAVE TO DO IS LISTEN"

) शक्य तितके साधे रहा...निसर्गाची मारून त्यावर गुजराण करणारे निसर्गाच्या हिटलिस्ट वर असतात हे कायमलक्षात ठेवा...

) अधिकाधिक काळ आत्म चिंतनात व्यतीत करा...त्याने विचार क्षीण होतात, फ़्रिक्वेन्सी लो अर्थात कमी कमीहोत जाते आणि तुम्ही निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाता...नामस्मरण हा त्यावरील एक सोपा उपाय आहे....

) सर्वात महत्वाचे काही संदेश:
तुका म्हणे उगेची रहावे जे जे होईल ते ते पहावे

अक्रा अक्रा बहु अक्रा काय अक्रा कळेचिना। गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभूवनी॥

पुढे अंत येईल तो दैन्यवाणा म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा

"ताठ बसा चळवळ" व्हिडीओ!!

"ताठ बसा चळवळ" व्हिडीओ स्वरुपात??? होय!! हे खरे आहे!

आमचे एक हितचिंतक श्री. धनंजय निद्रे यांनी हा सुंदर व्हिडिओ बनविला आहे...

जरूर पहा व प्रसार करा! आणि हो!!

ताठ बसा!!

प्रशांत

Upright...!?!

As a general and absolutely lenient observation, I discovered lately that most of the population has a tendency to sit in a bending position rather than straight and upright. Apart from a little sarcastic fact that this is the symbolic representation of the moral and value system of today’s world, this habit could prove fatal if continued and blissful if corrected.


The spinal cord of human body is straight and upright by birth naturally. Kids and children normally have straight back invariably. As they develop to become a teenager-youth-adult, matured (?) humans around make them habitual to bending with means like heavy Schoolbags, Computers, Videogames and TV to name a few. Ground sports and outdoor exercise is becoming more or less extinct allowing maximum time of the day for sitting. Study, work, rest – you name the reason and this habit enters the blood unwittingly. Taller people and women also adopt this awkward and unhealthy posture for the reasons of either inferiority complex or psychological result.

Function of lungs: Our lungs absorb the pure oxygen from the atmosphere and mix it with our blood keeping the blood healthy and pure. And ‘Pure blood makes Pink Health’ is the simplest doctrine. Lungs are encased in the ribs from all around and diaphragm puts pressure on them from below. When we sit in a bent position the pancreas put pressure on the diaphragm which transfers the pressure onto lungs. But in an upright posture lungs can enjoy about 30% more space to expand on the lower side. So to summarize the benefits of sitting straight, we can list them as –

• Body gets 30% more oxygen

• Increase in Blood purification by 30%

• Energy level increase by 30%

• Increase in immunity by 30%

• Burning of fats increase by 30%

• Refresh and rejuvenate in minutes

• And if nothing impressive personality!

Try an experiment when you feel really tired and exhausted. Instead of lying down on a coach or sitting in a relaxed posture on a chair, try to sit real straight and upright only for five minutes and see for yourself how revived you start feeling…! By sitting straight our respiratory system is exploited and put to optimum use. This one small habit will lead to an honorable and ‘upright’ old age.

What’s more, this habit will not cost you a single penny…! Great blessings come in small packages. This little habit can change the entire course of your health-life and the moment you started reading this you started straightening simultaneously and the moment you finish reading this, you are supposed to be sitting absolutely S-T-R-A-I-G-H-T and keep it that way whenever and wherever you S-I-T! You are most welcome to email, distribute and share this with maximum number of people to show that you care…!


Stay tuned and Sit Straight…!

(Original Marathi Article by – Prashant Balkrishna Kulkarni. Thank you Manish Puranik for beutiful translation!i)

निवडक समर्थ राजकारण विचार

:दीर्घ सूचना आधीं कळे| सावधपणें तर्क प्रबळे |
जाणजाणोनि निवळे| येथायोग्य ||६||

He gets info from his intellegence ....then he thinks over it....comes to a conclusion carefully....and takes info from more people and then only takes action, to settle it...in right manner
 शुक्रवार रोजी 10-41 am वाजता पाठवला

आपणाकरितां शाहाणे होती| ते सहजचि सोये धरिती |
जाणतेपणाची महंती| ऐसी असे ||१७||
He teaches people many things....thus indirectly he becomes their mentor and they start following him...so being an officer who is learned, thus helps...

राखों जाणें नीतिन्याय| न करी न करवी अन्याये |
कठीण प्रसंगीं उपाये| करूं जाणे ||१८||
ऐसा पुरुष धारणेचा| तोचि आधार बहुतांचा |
दास म्हणे रघुनाथाचा| गुण घ्यावा ||१९||
here the word dharana is imp...dharana means wearing...bearing, whatever you have learnt till date....nusate pustaki dnyan nako...ase...

मुख्य हरिकथा निरूपण| दुसरें तें राजकरण |
तिसरें तें सावधपण| सर्वविषईं ||४||
चौथा अत्यंत साक्षप| फेडावे नाना आक्षप |
अन्याये थोर अथवा अल्प| क्ष्मा करीत जावे ||५||
जाणावें पराचें अंतर| उदासीनता निरंतर |
नीतिन्यायासि अंतर| पडोंच नेदावें ||६||
संकेतें लोक वेधावा| येकूनयेक बोधावा |
प्रपंचहि सावरावा| येथानशक्त्या ||७||
प्रपंचसमयो वोळखावा| धीर बहुत असावा |
संमंध पडों नेदावा| अति परी तयाचा ||८||
उपाधीसी विस्तारावें| उपाधींत न संपडावें |
नीचत्व पहिलेंच घ्यावें| आणि मूर्खपण ||९||
दोष देखोन झांकावे| अवगुण अखंड न बोलावे |
दुर्जन सांपडोन सोडावे| परोपकार करूनी ||१०||
upaadhi=Post

अपार असावें पाठांतर| सन्निधचि असावा विचार |
सदा सर्वदा तत्पर| परोपकारासी ||१५||
शांती करून करवावी| तऱ्हे सांडून सांडवावी |
क्रिया करून करवावी| बहुतांकरवीं ||१६||
करणें असेल अपाये| तरी बोलोन दाखऊं नये |
परस्परेंचि प्रत्यये| प्रचितीस आणावा ||१७||
जो बहुतांचे सोसीन| त्यास बहुतेक लोक मिळेना |
बहुत सोसितां उरेना| महत्व आपुलें ||१८||
राजकारण बहुत करावें| परंतु कळोंच नेदावें |
परपीडेवरी नसावें| अंतःकरण ||१९||
लोक पारखून सांडावे| राजकारणें अभिमान झाडावे |
पुन्हा मेळऊन घ्यावें| दुरील दोरे ||२०||
हिरवटासी दुरी धरावें| कचरटासी न बोलावें |
समंध पडता सोडून जावें| येकीकडे ||२१||
ऐसें असो राजकारण| सांगतां तें असाधारण |
सुचित अस्तां अंतःकरण| राजकारण जाणे ||२२||
read each n every ovi...selected detoy wachayla...
far imp ahet sarwa
for an officer or manager...
पाहातां तरी सांपडेना| कीर्ति करूं तरी राहेना |
आलें वैभव अभिळासीना| कांहीं केल्यां ||२४||
येकांची पाठी राखणें| येकांस देखो न सकणें |
ऐसीं नव्हेत कीं लक्षणें| चातुर्याचीं ||२५||
कर्म केलेंचि करावें| ध्यान धरिलेंचि धरावें |
विवरलेंचि विवरावें| पुन्हा निरूपण ||१||

राजकारण निरूपण (दशक अकरावा-समास पाचवा)

राजकारण निरूपण
            ||श्रीराम ||
कर्म केलेंचि करावें| ध्यान धरिलेंचि धरावें |
विवरलेंचि विवरावें| पुन्हा निरूपण ||||
तैसें आम्हांस घडलें| बोलिलेंचि बोलणें पडिलें |
कां जें बिघडलेंचि घडलें| पाहिजे समाधान ||||
अनन्य राहे समुदाव| इतर जनास उपजे भाव |
ऐसा आहे अभिप्राव| उपायाचा ||||
मुख्य हरिकथा निरूपण| दुसरें तें राजकरण |
तिसरें तें सावधपण| सर्वविषईं ||||
चौथा अत्यंत साक्षप| फेडावे नाना आक्षप |
अन्याये थोर अथवा अल्प| क्ष्मा करीत जावे ||||
जाणावें पराचें अंतर| उदासीनता निरंतर |
नीतिन्यायासि अंतर| पडोंच नेदावें ||||
संकेतें लोक वेधावा| येकूनयेक बोधावा |
प्रपंचहि सावरावा| येथानशक्त्या ||||
प्रपंचसमयो वोळखावा| धीर बहुत असावा |
संमंध पडों नेदावा| अति परी तयाचा ||||
उपाधीसी विस्तारावें| उपाधींत न संपडावें |
नीचत्व पहिलेंच घ्यावें| आणि मूर्खपण ||||
दोष देखोन झांकावे| अवगुण अखंड न बोलावे |
दुर्जन सांपडोन सोडावे| परोपकार करूनी ||१०||
तऱ्हे भरोंच नये| सुचावे नाना उपाये |
नव्हे तेंचि करावें कायें| दीर्घ प्रेत्नें ||११||
फड नासोंचि नेदावा| पडिला प्रसंग सांवरावा |
अतिवाद न करावा| कोणीयेकासी ||१२||
दुसऱ्याचें अभिष्ट जाणावें| बहुतांचें बहुत सोसावें |
न सोसे तरी जावें| दिगांतराप्रती ||१३||
दुखः दुसऱ्याचें जाणावें| ऐकोन तरी वांटून घ्यावें |
बरें वाईट सोसावें| समुदायाचें ||१४||
अपार असावें पाठांतर| सन्निधचि असावा विचार |
सदा सर्वदा तत्पर| परोपकारासी ||१५||
शांती करून करवावी| तऱ्हे सांडून सांडवावी |
क्रिया करून करवावी| बहुतांकरवीं ||१६||
करणें असेल अपाये| तरी बोलोन दाखऊं नये |
परस्परेंचि प्रत्यये| प्रचितीस आणावा ||१७||
जो बहुतांचे सोसीन| त्यास बहुतेक लोक मिळेना |
बहुत सोसितां उरेना| महत्व आपुलें ||१८||
राजकारण बहुत करावें| परंतु कळोंच नेदावें |
परपीडेवरी नसावें| अंतःकरण ||१९||
लोक पारखून सांडावे| राजकारणें अभिमान झाडावे |
पुन्हा मेळऊन घ्यावें| दुरील दोरे ||२०||
हिरवटासी दुरी धरावें| कचरटासी न बोलावें |
समंध पडता सोडून जावें| येकीकडे ||२१||
ऐसें असो राजकारण| सांगतां तें असाधारण |
सुचित अस्तां अंतःकरण| राजकारण जाणे ||२२||
वृक्षीं रूढासी उचलावें| युद्धकर्त्यास ढकलून द्यावें |
कारबाराचें सांगावें| आंग कैसें ||२३||
पाहातां तरी सांपडेना| कीर्ति करूं तरी राहेना |
आलें वैभव अभिळासीना| कांहीं केल्यां ||२४||
येकांची पाठी राखणें| येकांस देखो न सकणें |
ऐसीं नव्हेत कीं लक्षणें| चातुर्याचीं ||२५||
न्याय बोलतांहि मानेना| हित तेंचि न ये मना |
येथें कांहींच चालेना| त्यागेंवीण ||२६||
श्रोतीं कळोन आक्षेपिलें| म्हणौन बोलिलेंचि बोलिलें |
न्यूनपूर्ण क्ष्मा केलें| पाहिजे श्रोतीं ||२७||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
राजकारणनिरूपणनाम समास पांचवा ||||११. ५

निस्पृह लक्षण (महंत लक्षणांचाच विस्तार...) (दासबोध:दशक चौदावा-समास पहिला)

निस्पृह लक्षणनाम
            ||श्रीराम ||
ऐका स्पृहाची सिकवण| युक्ति बुद्धि शाहाणपण |
जेणें राहे समाधान| निरंतर ||||
सोपा मंत्र परी नेमस्त| साधें वोषध गुणवंत |
साधें बोलणें सप्रचित| तैसें माझें ||||
तत्काळचि अवगुण जाती| उत्तम गुणाची होये प्राप्ती |
शब्दवोषध तीव्र श्रोतीं| साक्षपें सेवावें ||||
निस्पृहता धरूं नये| धरिली तरी सोडूं नये |
सोडिली तरी हिंडों नये| वोळखीमधें ||||
कांता दृष्टी राखों नये| मनास गोडी चाखऊं नये |
धारिष्ट चळतां दाखऊं नये| मुख आपुलें ||||
येकेस्थळीं राहों नये| कानकोंडें साहों नये |
द्रव्य दारा पाहों नये| आळकेपणें ||||
आचारभ्रष्ट होऊं नये| दिल्यां द्रव्य घेऊं नये |
उणा शब्द येऊं नये| आपणावरी ||||
भिक्षेविषीं लाजों नये| बहुत भिक्षा घेऊं नये |
पुसतांहि देऊं नये| वोळखी आपली ||||
धड मळिन नेसों नये| गोड अन्न खाऊं नये |
दुराग्रह करूं नये| प्रसंगें वर्तावें ||||
भोगीं मन असों नये| देहदुःखें त्रासों नये |
पुढें आशा धरूं नये| जीवित्वाची ||१०||
विरक्ती गळों देऊं नये| धारिष्ट चळों देऊं नये |
ज्ञान मळिण होऊं नये| विवेकबळें ||११||
करुणाकीर्तन सोडूं नये| अंतर्ध्यान मोडूं नये ||
प्रेमतंतु तोडूं नये| सगुणमूर्तीचा ||१२||
पोटीं चिंता धरूं नये| कष्टें खेद मानूं नये |
समइं धीर सांडूं नये| कांहीं केल्या ||१३||
अपमानितां सिणों नये| निखंदितां कष्टों नये |
धिःकारितां झुरों नये| कांहीं केल्या ||१४||
लोकलाज धरूं नये| लाजवितां लाजों नये  |
खिजवितां खिजों नये| विरक्त पुरुषें ||१५||
शुद्ध मार्ग सोडूं नये| दुर्जनासीं तंडों नये |
समंध पडों देऊं नये| चांडाळासी ||१६||
तपीळपण धरूं नये| भांडवितां भांडों नये |
उडवितां उडऊं नये| निजस्थिती आपुली ||१७||
हांसवितां हासों नये| बोलवितां बोलों नये |
चालवितां चालों नये| क्षणक्ष्णा ||१८||
येक वेष धरूं नये| येक साज करूं नये |
येकदेसी होऊं नये| भ्रमण करावें ||१९||
सलगी पडों देऊं नये| प्रतिग्रह घेऊं नये |
सभेमध्यें बैसों नये| सर्वकाळ ||२०||
नेम आंगीं लाऊं नये| भरवसा कोणास देऊं नये |
अंगीकार करूं नये| नेमस्तपणाचा ||२१||
नित्यनेम सांडूं नये| अभ्यास बुडों देऊं नये |
परतंत्र होऊं नये| कांहीं केल्यां ||२२||
स्वतंत्रता मोडूं नये| निरापेक्षा तोडूं नये |
परापेक्षा होऊं नये| क्षणक्ष्णा ||२३||
वैभव दृष्टीं पाहों नये| उपाधीसुखें राहों नये |
येकांत मोडूं देऊं नये| स्वरूपस्थितीचा ||२४||
अनर्गळता करूं नये| लोकलाज धरूं नये |
कोठेंतरी होऊं नये| आसक्त कदां ||२५||
परंपरा तोडूं नये| उआपाधी मोडूं देऊं नये |
ज्ञानमार्गे सोडूं नये| कदाकाळीं ||२६||
कर्ममार्ग सांडूं नये| वैराग्य मोडूं देऊं नये |
साधन भजन खंडूं नये| कदाकाळीं ||२७||
अतिवाद करूं नये| अनित्य पोटीं धऊं नये |
रागें भरीं भरों नये|  भलतीकडे ||२८||
न मनी त्यास सांगों नये| कंटाळवाणें बोलों नये |
बहुसाल असो नये| येकें स्थळीं ||२९||
कांहीं उपाधी करूं नये| केली तरी धरूं नये |
धरिली तरी सांपडों नये| उपाधीमध्यें ||३०||
थोरपणें असो नये| महत्त्व धरून बैसों नये |
कांहीं मान इछूं नये| कोठेंतरी ||३१||
साधेपण सोडूं नये| सानेपण मोडूं नये |
बळात्कारें जोडूं नये| अभिमान आंगीं ||३२||
अधिकारेवीण सांगों नये| दाटून उपदेश देऊं नये |
कानकोंडा करूं नये| परमार्थ कदा ||३३||
कठीण वैराग्य सोडूं नये| कठीण अभ्यास सांडूं नये |
कठिणता धरूं नये| कोणेकेविशइं ||३४||
कठीण शब्द बोलों नये| कठीण आज्ञा करूं नये |
कठीण धीरत्व सोडूं नये| कांहीं केल्यां ||३५||
आपण आसक्त होऊं नये| केल्यावीण सांगों नये |
बहुसाल मागों नये| शिष्यवर्गांसी ||३६||
उत्धट शब्द बोलों नये| इंद्रियेंस्मरण करूं नये |
शाक्तमार्गें भरों नये| मुक्तपणें भरीं ||३७||
नीच कृतीं लाजों नये| वैभव होतां माजों नये |
क्रोधें भरीं भरों नये| जाणपणें ||३८||
थोरपणें चुकों नये| न्याये नीति सांडूं नये |
अप्रमाण वर्तों नये| कांहीं केल्या ||३९||
कळल्यावीण बोलों नये| अनुमानें निश्चये करूं नये |
सांगतां दुःख धरूं नये| मूर्खपणें ||४०||
सावधपण सोडुं नये| व्यापकपण सांडुं नये |
कदा सुख मानूं नये| निसुगपणाचें ||४१||
विकल्प पोटीं धरूं नये| स्वार्थआज्ञा करूं नये |
केली तरी टाकूं नये| आपणास पुढें ||४२||
प्रसंगेंवीण बोलों नये| अन्वयेंवीण गाऊं नये |
विचारेंवीण जाऊं नये| अविचारपंथें ||४३||
परोपकार सांडूं नये| परपीडा करूंनये |
विकल्प पडों देऊं नये| कोणीयेकासी ||४४||
नेणपण सोडूं नये| महंतपण सांडूं नये |
द्रव्यासाठीं हिंडों नये| कीर्तन करीत ||४५||
संशयात्मक बोलों नये| बहुत निश्चये करूं नये |
निर्वाहेंवीण धरूं नये| ग्रंथ हातीं ||४६||
जाणपणें पुसों नये| अहंभाव दिसों नये |
सांगेन ऐसें म्हणों नये| कोणीयेकासी ||४७||
ज्ञानगर्व धरूं नये| सहसा छळणा करूं नये |
कोठें वाद घालुं नये| कोणीयेकासी ||४८||
स्वार्थबुद्धी जडों नये| कारबारीं पडों नये |
कार्यकर्ते होऊं नये| राजद्वारीं ||४९||
कोणास भर्वसा देऊं नये| जड भिक्षा मागों नये |
भिक्षेसाथीं सांगों नये| परंपरा आपुली ||५०||
सोइरिकींत पडों नये| मध्यावर्ति घडों नये |
प्रपंचाची जडों नये| उपाधी आंगीं ||५१||
प्रपंचप्रस्तीं जाऊं नये| बाष्कळ अन्न खाऊं नये |
पाहुण्यासरिसें घेऊं नये| आमंत्रणें कदां ||५२||
श्राध पक्ष सटी सामासें| शांती फळशोबन बारसें |
भोग राहात बहुवसें| नवस व्रतें उद्यापनें ||५३||
तेथें निस्पृहें जाऊं नये| त्याचें अन्न खाऊं नये |
येळिलवाणें करूं नये| आपणासी ||५४||
लग्नमुहुर्तीं जाऊं नये| पोटासाठीं गाऊं नये |
मोलें कीर्तन करूं नये| कोठेंतरी ||५५||
आपली भिक्षा सोडूं नये| वारें अन्न खाऊं नये |
निस्पृहासि घडों नये| मोलयात्रा ||५६||
मोलें सुकृत करूं नये| मोलपुजारी होऊं नये |
दिल्हा तरी घेऊं नये| इनाम निस्पृहें ||५७||
कोठें मठ करूं नये| केला तरी तो धरूं नये |
मठपती होऊन बैसों नये| निस्पृह पुरुषें ||५८||
निस्पृहें अवघेंचि करावें| परी आपण तेथें न सांपडावें |
परस्परें उभारावें| भक्तिमार्गासी ||५९||
प्रेत्नेंविण राहों नये| आळस दृष्टी आणूं नये |
देह अस्तां पाहों नये| वियोग उपासनेचा ||६०||
उपाधीमध्यें पडों नये| उपाधी आंगीं जडों नये |
भजनमार्ग मोडूं नये| निसंगळपणें ||६१||
बहु उपाधी करूं नये| उपाधीविण कामा नये |
सगुणभक्ति सोडूं नये| विभक्ति खोटी ||६२||
बहुसाल धांवों नये| बहुसाल साहों नये |
बहुत कष्ट करूं नये| असुदें खोटें ||६३||
बहुसाल बोलों नये| अबोलणें कामा नये |
बहुत अन्न खाऊं नये| उपवास खोटा ||६४||
बहुसाल निजों नये| बहुत निद्रा मोडुं नये |
बहुत नेम धरूं नये| बाश्कळ खोटें ||६५||
बहु जनीं असों नये| बहु आरण्य सेऊं नये |
बहु देह पाळूं नये| आत्महत्या खोटी ||६६||
बहु संग धरूं नये| संतसंग सांडुं नये |
कर्मठपण कामा नये| अनाचार खोटा ||६७||
बहु लोकिक सांडुं नये| लोकाधेन होऊं नये |
बहु प्रीती कामा नये| निष्ठुरता खोटी ||६८||
बहु संशये धरूं नये| मुक्तमार्ग कामा नये |
बहु साधनीं पडों नये| साधनेंवीण खोटें ||६९||
बहु विषये भोगूं नये| विषयत्याग करितां नये |
देहलोभ धरूं नये| बहु त्रास खोटा ||७०||
वेगळा अनुभव घेऊं नये| अनुभवेंवीण कामा नये |
आत्मस्थिती बोलों नये| स्तब्धता खोटी ||७१||
मन उरों देऊं नये| मनेंवीण कामा नये |
अलक्ष वस्तु लक्षा नये| लक्षेंवीण खोटें ||७२||
मनबुद्धिअगोचर| बुद्धीवीण अंधकार |
जाणीवेचा पडो विसर| नेणीव खोटी ||७३||
ज्ञातेपण धरूं नये| ज्ञानेंवीण कामा नये |
अतर्क्य वस्तु तर्का न ये| तर्केंवीण खोटें ||७४||
दृश्यस्मरण काम नये| विस्मरण पडों नये |
कांहीं चर्चा करूं नये| केलियावीण न चले ||७५||
जगीं भेद कामा नये| वर्णसंकर करूं नये |
आपला धर्म उडऊं नये| अभिमान खोटा ||७६||
आशाबद्धत बोलों नये| विवेकेंवीण चालों नये |
समाधान हालों नये| कांहीं केल्यां ||७७||
अबद्ध पोथी लेहों नये| पोथीवीण कामा नये |
अबद्ध वाचूं नये| वाचिल्यावीण खोटें ||७८||
निस्पृहें वगत्रुत्व सांडूं नये| आशंका घेतां भांडों नये |
श्रोतयांचा मानूं नये| वीट कदा ||७९||
हें सिकवण धरितां चित्तीं| सकळ सुखें वोळगती |
आंगीं बाणें महंती| अकस्मात ||८०||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
निस्पृहलक्षणनाम समास पहिला ||||१४. १